Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Crime : तुझ्यामुळे माझं ब्रेकअप झालं, ऑफिसमधल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकरुन तरुणाला बेदम मारहाण, बंदूक रोखली अन्...

Crime News Pune: ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकडून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडने तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Yash Shirke

ब्रेकअप झाल्याच्या रागातून एका तरुणाने एक्स-गर्लफ्रेंडच्या कामामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. या व्यक्तीवरु संशय घेत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. 'तुझ्यामुळे माझं ब्रेकअप झालं', असे म्हणत तरुणाने पीडित व्यक्तीला बेदम मारहाण केली. या प्रकरणी फुलेनगर परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. त्यावरुन पोलिसांंनी लोणावळ्याचील आदर्श चौधरीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

नेमकं काय घडलं?

फिर्यादी व्यक्ती हा विमाननगर येथील एका कंपनीमध्ये कामाला आहे. या कंपनीतील एका तरुणीबरोबर आदर्श चौधरी रिलेशनशिपमध्ये होता. त्या तरुणीनेच फिर्यादीची आदर्शशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये कधीही, कुठलाही संपर्क झाला नव्हता. २१ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास आदर्श ऑफिसच्या बाहेर आल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने त्याला फोन केला.

दोघांची कंपनीच्या दारात भेट झाली. त्यानंतर आदर्शच्या बाईकवर बसून दोघे वाघोलीतील सेंट जोसेफ स्कूलजवळच्या एका मोकळ्या मैदानात गेले. तेथे गेल्यानंतर आदर्शने फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली. त्याला लाथाबुक्क्यांनी, बेल्ट आणि लाकडाने बेदम मारहाण केली. बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

आदर्श आणि त्या तरुणीचे ब्रेकअप झाले होते. याला फिर्यादी व्यक्ती कारणीभूत असल्याचे आरोपी आदर्श चौधरीला वाटले. 'तुझ्यामुळे माझी वाट लागली. आमचे प्रेमसंबंध तुझ्यामुळेच तुटले. याला तूच कारणीभूत आहेस, आता मी तुझं आयुष्य उध्वस्त करणार', अशी धमकी आदर्शने दिली. विमाननगर पोलीस चौकीबाहेर एक मुलगी उभी आहे. ती तुझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करेल, असे म्हणत त्याने फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मारहाणीनंतर आदर्श बाईकवर बसून पळून गेला. तर फिर्यादीला मित्राच्या मदतीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT