Pick-up tempo 
मुंबई/पुणे

Viral Video: ड्रायव्हर नाही काय नाही, रात्रीच्या अंधारात पुण्याच्या रस्त्यावर पीकअप टेम्पो उलटा सुसाट सुटला! VIDEO

Viral Video: पुण्यातील हडपसर भागात असलेल्या वैदूवाडी उड्डाणपुलावर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. चालक नसतानाही पिकअप टेम्पोने आपली वाट धरली ते पण उलट्या पावली.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या वैदूवाडी उड्डाणपुलावर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची पिकअप टेम्पो सुसाट सुटला, तेही रिव्हर्स. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन, अहो! खरी गमंत पुढे आहे, टेम्पो रिव्हर्स सुटला त्यावेळी टेम्पोत चालक नव्हता. विनाचालक टेम्पाने उलट्या पावली आपली वाट धरली होती. आता विचार करा, टेम्पो विनाचालक धावतो तेही उलटा आणि त्यात रात्रीची वेळ आहे ना धडकी भरवणारी घटना.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान ही घटना रविवारी रात्री ११.४५ वाजता घडली. हा रिव्हर्स जाणारा टेम्पो डिव्हायडरला धडकल्याने मात्र मोठा अनर्थ टळलाय. हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचा आहे, चालक टेम्पो चालू ठेवून उतरला असावा किंवा टेम्पो उभा असावा. त्याच दरम्यान टेम्पो रिव्हर्स गिअरमध्ये पडला आणि ८०च्या वेगाने हा टेम्पो मागे धावू लागला. सुदैवाने मागून कोणताचे वाहन आले नसल्याने कोणताच अनर्थ टळला.

मनपाचा पिकअप टेम्पो ८० प्रतितासच्या वेगाने उलट्या दिशेने धावत होता, जवळपास ५०० फूट अंतर हा टेम्पो रिव्हर्स झाला. रस्त्यावरील डिव्हायडरवर धडकल्याने हा टेम्पो पूर्णपणे थांबला. त्यामुळे कोणताच अपघात झाला नाही. दरम्यान विनाचालक धावणाऱ्या टेम्पोचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने बाईकवरुन जाणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ शूट केलाय. मात्र घडलेल्या प्रकरणाची चौकशी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका याप्रकरणी काय कारवाई करते ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT