Pune Army Scam Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: लष्करात नोकरी लावण्याचं आमिष, २ तरूणांना तब्बल ५ लाखांना गंडवलं

Pune youths cheated in job scam: लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरूणांना ४ लाख ८० हजार रूपयांना गंडवलं आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरूणांना ४ लाख ८० हजार रूपयांना गंडवलं आहे. नोकरीचे आमिष दाखवून आरोपीने ४ लाख ८० हजार उकळले आहे. आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच रवींद्र जनार्दन बिलाडे यानं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाडे आणि धामीची ओळख एका व्यक्तीमार्फत झाली होती. त्यावेळी धामीनं आपण लष्करी रूग्णालयात नोकरी करत असल्याचं सांगितलं. नंतर धामी याने लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बिलाडे आणि त्याचा मित्र दीपक रोकडे बळी पडले. नंतर धामीने पैशांची मागणी केली.

धामीने बिलाडेकडून २ लाख ८० हजार तर, त्याच्या मित्राकडून २ लाख रूपये घेतले होते. काही दिवसानंतर दोघांनी बिलाडेकडे लष्करातील नोकरी बाबत विचारणा केली. त्यानंतर धामी उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. दोघांना टाळू लागला. त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण धामी त्या दोघांना उत्तर देत नव्हता.

आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर बिलाडे आणि त्याच्या मित्रांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहायक निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत. या आरोपीने अजून कुणाला फसवले आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

SCROLL FOR NEXT