Pune Traffic Jam Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic Jam: पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; जीव गेल्यास जबाबदार कोण?

Traffic Jam: सर्वसामान्यांना कितीही तळमळीने रुग्णवाहिकेला वाट करून देण्याची इच्छा होत असली तरी ते शक्य झाले नाही.

Dnyaneshwar Choutmal

Pune News: पुणेकरांना वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच वाहतूक कोंडीमुळे आज एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. रुग्णवाहिका वेळेवर रुग्नालयात पोहचणे गरजेचे आहे. मात्र अशा ट्राफीकमध्ये अडकल्याने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज दुपारी १२ च्या सुमारास औंधकडून पुणे विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. याच वाहतूक कोंडीत गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली. सर्वसामान्यांना कितीही तळमळीने रुग्णवाहिकेला वाट करून देण्याची इच्छा होत असली तरी ते शक्य झाले नाही. कारण रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने गाड्या बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला वाट करून देणे शक्य नव्हते.

या सगळ्यात पुणे पोलिसांच्या वाहतुकीच्या नियोजनचा अभाव असल्याचे कारण समोर येत आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई ॲक्टिव्ह पणे केली जाते मात्र वाहतूक कोंडी होऊनये यासाठी रस्त्यावर उभे ठाकून वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात पुणे वाहतूक पोलिसांचा सुस्तावलेपणा दिसतोय. या वाहतूक कोंडीमुळे जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर देखील सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शनविरी रात्री देखील पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री देखील अवजड वाहनांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यातच काल रविवारचा दिवस असल्याने अनेक पर्यटक हे लोणावळा महाबळेश्वर, कोल्हापूर, आणि अन्य ठिकाणी पर्यटनासाठी निघाले होते. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडी वाढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT