सचिन बनसोडे
लोणी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरातील दोन अल्पवयीन मुलीना आपल्या प्रेमाच्या (Ahmednagar) जाळ्यात ओढले. यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)
दाढ बुद्रुक (ता. राहता) येथील दोन युवकांनी दहावी आणि नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींशी ओळख (Crime News) निर्माण केली. यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून मध्यरात्रीच्या वेळी त्यांच्या राहत्या घरातून पळवून नेत त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले. या प्रकरणी राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील दोन आरोपींना लोणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चार दिवसांची पोलीस कोठडी
ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.