Pune Traffic Changes  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: पुणेकरांठी महत्वाची बातमी! बोपदेव घाट आजपासून ७ दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Bopdev Ghat Closed: पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे-सासवडला जोडणारा बोपदेव घाट पुढील ७ दिवसांपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणेकरांनी कुठून कसा प्रवास करावा? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • बोपदेव घाट आजपासून पुढील ७ दिवसांसाठी बंद

  • १४ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी

  • रस्त्याच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणाचे काम सुरू

  • पर्यायी मार्ग म्हणून दिवे घाट आणि चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा

सागर आव्हाड, पुणे

सासवड आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या बोपदेव घाटाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. बोपदेव घाटात आजपासून पुढील ७ दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या घाटातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आजपासून बुधवारपर्यंत म्हणजे १४ जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

बोपदेव घाट १४ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणा आहे. दुरूस्ती आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बोपदेव घाटामध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा घाट वाहतुकीसाठी आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बोपदेव घाट बंद असल्यामुळे प्रवाशांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले आहे.

बोपदेव घाटामध्ये दुरूस्तीचे काम सुरू राहणार असल्याने या कालावधीत एकेरी वाहतुकही सुरू राहणार नाही. त्यामुळे वाहनचालकांनी या घाटाच्या दिशेने जाऊ नये. वाहनचालकांनी बोपदेव घाटाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. बोपदेव घाट हा फक्त सासवड- कोंढवा या ठिकाणच्या प्रवाशांसाठीच नाही तर पुरंदरसह अनेक तालुक्यांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आणि हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : दिवसभरात प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांचा आनंद गगनात मावणार नाही

Vande Bharat Sleeper: 'या' दिवशी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

दादांना घातला थेट क्रेनला लटकून हार; पिंपरीत कार्यकर्त्याचा भन्नाट स्टंट, नेत्याला इम्प्रेस करण्यासाठी काय पण

Aawaj Maharashtra Pune: 'निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंट झाल्या, आश्वासनांपलीकडे विकास हवा'

SCROLL FOR NEXT