Pune Traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, शहरातील अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Pune Traffic Police: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये १ ऑगस्ट रोजी वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे बदल करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाची यादी वाहतूक पोलिसांनी जाहीर केली.

Priya More

Summary -

  • अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पुण्यात १ ऑगस्टला वाहतुकीत बदल.

  • जेधे चौक, सारसबाग, सिंहगड रोडसह अनेक रस्ते बंद राहणार.

  • पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले.

  • अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

अक्षय बडवे, पुणे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्टला पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांच्या वतीने सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल लागू करण्यात आले असून काही रस्ते तात्पुरते बंद राहणार आहेत.

वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. मात्र, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस यांसारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना यामध्ये सूट देण्यात आली आहे.

पोलिसांनी पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी वाहनचालकांनी मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. या दिवशी पुणे शहरात आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कोणत्या महामार्गावर वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? -

- जेधे चौक ते सारसबाग पर्यंतचा बालाजी विश्वनाथ पथ वाहतुकीसाठी बंद राहील.

- जेधे चौकाकडून सिंहगड रोडकडे जाण्यासाठी सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

- सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक दांडेकर पूल – नाथ पै चौक – ना.सी. फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक मार्गे वळवण्यात येईल.

- जेधे चौकातील वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे प्रवेश बंद राहील.

- कात्रजहून येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळावे.

- वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.

- वाहनचालकांनी राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

- सावरकर चौक ते पुरम चौकदरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद राहील.

- नाथ पै चौक – सावरकर चौक – दांडेकर पूल – ना.सी. फडके चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड – पुरम चौक हा पर्यायी मार्ग खुला राहील.

- दांडेकर पूल ते सावरकर चौककडे जाणारी वाहतूक बंद राहील.

- दांडेकर पूल व सावरकर चौकातील वाहतूक दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरू ठेवण्यात येईल.

- निलायम ब्रिजवरून सावरकर चौकाकडे जाणारी वाहने पर्वती गाव मार्गे वळवली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT