Pranjal Khewalkar Rave Party
Pranjal Khewalkar Rave Party Saam Tv

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

Pranjal Khewalkar Rave Party : प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली ड्रग प्रकरणातील अटक बनावट असून त्यामागे पोलिसांचा कट असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. वकील ठोंबरे पाटील यांनी उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे.
Published on
Summary
  • प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील ड्रग पार्टी प्रकरणात अटक

  • वकिलांचा दावा – पोलिसांनीच ट्रॅप लावून बनावट कारवाई केली

  • कोकेन ज्या महिलेच्या पर्समध्ये सापडले ती पोलिसांनीच पाठवली – वकील

  • प्रकरण उच्च न्यायालयात जाणार, मोठा वळण येण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी पुण्यातील हॉटेल स्टेबर्ड येथे ड्रग पार्टी प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ही अटक करण्यात आली. याप्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या वकिलांनी या कारवाईला बनावट ठरवत खळबळजनक आरोप केले आहेत. संपूर्ण प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचा दावा करत, आता हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी जाहीर केले आहे.

पुण्यातील हॉटेल स्टेबर्ड येथे ड्रग्स पार्टीदरम्यान पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयासह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली. प्रांजल खेवलकर यांचं हे प्रकरण आता उच्च न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी जाहीर केले आहे. वकिल विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “ही कारवाई एक ट्रॅप होता. खेवलकरांना अडकवण्याचा हा नियोजित कट आहे. कोकेन ज्याच्या पर्समध्ये सापडले त्या महिलेची पाठवणीही पोलिसांनीच केली होती. याचा आम्ही तपशीलवार तपास करणार आहोत.” त्यांच्या या विधानामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

Pranjal Khewalkar Rave Party
Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही हॉटेलमध्ये झाली पार्टी; कोण कुठून आलं होतं?

दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून तपास अधिक गतीने सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले आहे की, खराडी येथील स्टेबर्ड हॉटेलमध्ये एप्रिल आणि मे महिन्यातही अशाच स्वरूपाच्या 'हाउस पार्टी' झाल्या होत्या. तसेच आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांसोबतच्या चॅटिंगचे पुरावे, पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स सापडल्या आहेत.

Pranjal Khewalkar Rave Party
Pune Rave Party: पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? ती महिला कोण? खडसेंच्या जावयाच्या वकिलांना शंका

या पार्टीसाठी ड्रग पुरवणारा मुख्य संशयित राहुल या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, याच राहुलने आरोपींना कोकेन व गांजाचा पुरवठा केला होता. मात्र अजून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी आरोपींकडून दहा मोबाईल जप्त केले असून त्यांची सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी सुरू आहे.

Pranjal Khewalkar Rave Party
Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

या मोबाईलच्या माध्यमातून हॉटेलमध्ये कोण सहभागी होते त्यांच्या ओळखी, तसेच मागील पार्टींचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. इतक्या गंभीर गुन्ह्याची पाळेमुळे शहरात रोवलेली असताना पोलिस यंत्रणा अपयशी का ठरली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Q

प्रांजल खेवलकर कोण आहेत?

A

प्रांजल खेवलकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.

Q

त्यांच्यावर काय आरोप आहेत?

A

पुण्यातील हॉटेल स्टेबर्ड येथे ड्रग पार्टीमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Q

त्यांच्या वकिलांचा काय दावा आहे?

A

वकील ठोंबरे पाटील यांनी सांगितले की, ही कारवाई बनावट असून खेवलकर यांना अडकवण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला.

Q

पुढील कायदेशीर पावले काय असणार आहेत?

A

प्रकरण आता उच्च न्यायालयात नेण्यात येणार असून पोलिसी कारवाईला न्यायालयीन आव्हान दिलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com