सचिन जाधव, साम टीव्ही
गैरहजर राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेस वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला आहे. भारती दीपक मोरे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुख्याधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी अचानक शाळेला भेट दिली. त्यावेळी शिक्षिका भारती मोरे या अनुपस्थित असल्याचे आढळले. मात्र, रजिस्टरवर मोरे यांची सही होती. विशेष म्हणजे त्यांच्या जागी दुसऱ्या महिला होत्या. ती महिला मोरे शिक्षिकेच्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या.
या दरम्यान या गोष्टीचा तपास करण्यात आल्या. भारती या त्या महिलेला ठराविक रक्कम देऊन अध्यापनासाठी ठेवले असल्याची खात्री झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी भारती मोरे यांना खुलासा देण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाची कारणे
भारती मोरे यांच्यावर विनापरवानगी गैरहजर राहणे, विनापरवानगी मुख्यालय सोडणे, कर्तव्यात निष्काळजीपणा करणे, गैरहजर कालावधीत खासगी व्यक्तीला वर्गाचा ताबा देणे, वर्ग उघडे ठेवून चाव्या त्रयस्त व्यक्तीकडे देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस अडथळा निर्माण करणे, या कारणांमुळे निलंबन करण्यात आले.
चौकशी समिती गठीत
नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.समितीचा अहवाल येईपर्यंत मोरे यांचे निलंबन राहणार आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.