Konkan Railway Saam TV
मुंबई/पुणे

Pune Train Cancelled: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुण्यातून जाणाऱ्या अनेक ट्रेन आज रद्द; वाचा सविस्तर

Pune Railway Station Train Cancelled: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. २९ जुलै २०२४

पुण्यातून रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी. पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातून रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली असून पुणे स्टेशनमधून सुटणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आला असून, काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

कुठल्या रेल्वे ट्रेन रद्द?

पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद- पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे - सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या सर्व गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये आज पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनीही प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. आज पहाटे 3 वाजेपासून हडपसर येथील गाडीतळापासून कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे.

काय आहेत मागण्या?

  • - सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब देण्यात कर्मचाऱ्यांना देण्यात यावी.

  • - ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे

  • - कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT