weather Google
मुंबई/पुणे

Pune Weather Update : पुणे तापले! ऊन्हाच्या असह्य झळा, उकाड्याने लोकांचे हाल; पुढील ५ दिवस कसं राहणार तापमान?

Weather Update Pune: पुणे शहर चांगलंच तापलं आहे. पुणेकरांना आता ऊन्हाच्या असह्य झळा सहन कराव्या लागत आहेत. तसेच उकाड्याने लोकांचे हाल होऊ लागले आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

राज्यातील काही भागात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरातही उन्हाची तीव्रता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातही लाटसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेला उष्मा असे वातावरण आणखी काही दिवस सहन करावे लागणार आहे. सध्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. तापमानात २२ एप्रिलनंतर किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसा असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांमुळे वातावरणातील उष्मा वाढलाय. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी शिवाजीनगर येथे ४१.२, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.८, हडपसर येथे ४०.२, चिंचवड येथे ३९.१, एनडीए येथे ३८.९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

पुण्यातील शिवाजीनगर येथे गुरुवारी ४०.१, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.१, पाषाण येथे ४०, हडपसर येथे ३९.९, चिंचवड येथे ३८.६, एनडीए येथे ३८.२ अंश सेल्सियस तापमान होते. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर आणि परिसरात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तरेकडील राज्यांत वाढलेले तापमान, तिकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होत आहे. उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. २२ एप्रिलनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ एप्रिलनंतर पुणेकरांना किंचित दिलासा मिळण्यासाची शक्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT