Bakarwadi : बाकरवडी खाताय? सावधान! बाजारात आली चितळे बंधू यांच्या नावाची बनावट बाकरवडी

Bakarwadi News : पुणेकरांनो बाकरवडी खाताय, तर सावधाव. बाजारात चितळे बंधू यांच्या नावाची बनावट बाकरवडी आली आहे.
Bakarwadi News
Bakarwadi Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या "चितळे स्वीट होम" नावाची बनावट बाकरवडी बाजारात आली आली आहे. "चितळे स्वीट होम" यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवण्यात आली आहे. ही बाकरवडी चितळे बंधू मिठाईवाले यांची असल्याचे भासवण्यात आली आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करुन फसवणूक ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आलं आहे.

Bakarwadi News
India Justice Report : कायदा सुव्यवस्था राखण्यात कर्नाटक आघाडीवर, महाराष्ट्र कुठल्या स्थानी? महत्वाचा अहवाल समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडीची बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून "चितळे स्वीट होम" नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी करण्यात आली.

'चितळे स्वीट होम' नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि आमच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली. चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवी कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत.

Bakarwadi News
Uddhav Thackeray : संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा; उद्धव ठाकरेंकडून ओपन चॅलेंज

खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे आढळून आली. या पाकिटांवर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी , कस्टमर केअर नंबर आणि वेबसाईट डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आली.

Bakarwadi News
Horrific incident : दोघांमध्ये तिसरा आला अन् घात झाला; प्रेमात आंधळ्या झालेल्या रीलस्टारने नवऱ्याला संपवलं

चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधु मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३५०, ६६(सी), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com