Uddhav Thackeray : संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा; उद्धव ठाकरेंकडून ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ठाकरेंनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठं आव्हान दिलं.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
Published On

ठाकरे गटाने आगामी निवडणुकांसाठी पक्षबांधणीसाठी सुरु केली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं. या निर्धार मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. 'संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ओपन चॅलेंज दिलं.

नाशिकच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्र खूप गरम झाला आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ज्या वेळाला उन्हात सभा होतात. उन्हातान्हात जमीन तापली, तुमची डोकी अन्यायाविरोधात किती तापली, हे महत्वाचं आहे'. संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला होता. त्यावेळी पत्रकार महिलेने नमूद केलं की, जे शहीद झाले, त्यात आकडा २०५ चा आकडा होता. पण १०५ चा अधिकृत मानला जातो'.

'माझा राग गुजरातींच्या विरोधात नाही. फक्त तिकडे बसलेल्या दोन लोकांविरोधात आहे. कोणाला खपवून घेणारा महाराष्ट्र नाही. गेल्या काही दिवसांत अमित शहा रायगडावर येऊन गेले. ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापूरते सीमीत ठेवू नका. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, त्यावेळी बातमी लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील शिलेदाराने समर्थकांसह धनुष्यबाण हाती घेतलं

'अमित शहा यांनी शिवरायांबद्दल आम्हाला सांगू नये. भाजपला छत्रपती शिवरायंबद्दल एवढंच वाटत असेल तर त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं.

दरम्यान, 'अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Horrific incident : दोघांमध्ये तिसरा आला अन् घात झाला; प्रेमात आंधळ्या झालेल्या रीलस्टारने नवऱ्याला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com