पुण्यातील श्रीराम चौकात कारने दिली अनेक वाहनांना धडक
या घटनेत काही दुचाकीस्वार जखमी
अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं
पुणे : पुण्यात अपघाताची मालिका सुरु आहे. पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. पुण्यातील श्रीराम चौकात ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कैद झाला आहे.
पुण्यातील एका चारचाकी वाहनाने अनेक वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. पुण्यातील काळेपडळ भागात असणाऱ्या श्रीराम चौकात ही घटना घडली आहे. एका चारचाकी वाहनाने काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर रस्त्यावर उभे असलेल्या लोकांमध्ये एकच भीती पसरली.
पुण्याच्या भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथे डंपर पत्र्याच्या घरावर पलटी होऊन झालेल्या दुर्दैवी अपघातात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. आलोक अशोक कचरे असं मृत्यू झालेल्या पाच वर्षे बालकाचे नाव आहे.
एका बांधकाम साईटवर क्रशसॅंड डंपरमधून खाली करत असताना डंपर अचानक उलटून बाजूच्या घरावरील पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे.
याप्रकरणी धोंडीबा रामभाऊ कचरे यांनी डंपर चालकाविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.