pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune : रुग्णालयाचा हलगर्जीपणा? जुळ्या बाळांचा जन्म, पण मायेची सावली हिरावली; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune latest News : पुण्यातील खासगी रुगणालयात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून भाजप आमदाराने गंभीर आरोप केला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितले. त्यातील काही रक्कम भरल्यानंतरही गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले नाही. त्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला, असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केलाय. पुण्यातील घटनेने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे ही दुर्दैवी घटना भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे. सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहायक आहेत. सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे ही गरोदर असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयाकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो, असं सांगितले. दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे हिला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटल पाठवलं होतं. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला.

जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे, असा आरोप अमित गोरखे यांनी केला आहे. दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी या संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT