Sassoon Hospital Corruption Case: पुण्याच्या 'ससून'मागे ससेमिरा! काल मेडिकल कॉलेजवर ACB चा छापा, आज अधिकाऱ्यांवर धाड

Sassoon Hospital: लाचखोरीत अटक करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात एसीबीला मोठं घबाड सापडलंय. एसीबीने जयंत चौधरी याच्या घरातून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलीय. तर सुरेश बोनावळे याच्या घरातून १ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलीय.
Sassoon Hospital
Sassoon Hospital Corruption Casesaam Tv
Published On

लाच प्रकरणामुळे ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लाच घेतल्याप्रकरणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सुरेश बोनावळे आणि जयंत चौधरी या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तापस करण्यात येत असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली.

दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरातील छापेमारीत एसीबीला मोठं घबाड सापडलंय. एसीबीने जयंत चौधरी याच्या घरातून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलीय. दुसरा आरोपी सुरेश बोनावळे याच्या घरातून १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. आज दोन्ही आरोपींना न्यायालायाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ या दोन्ही आरोपींना पकडलं होतं.

Sassoon Hospital
Maharashtra Politics: मतदार यादीत घोटाळा? भाजप नेत्याचं आमदारपद धोक्यात

ससून रुग्णालयातील संलग्न रुग्यालयात लाचखोरीचं प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणामुळं ससून रुग्णालय चर्चेत आलं होतं. लाचखोरी प्रकरणातील आरोपी लोकसेवक यांना विशेष न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एसीबीने कारवाई करत सुरेश बोनावळे आणि जयंत चौधरी या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

Sassoon Hospital
Pune Accident : कोथरूड पुलावर पहाटे दुचाकीचा भीषण अपघात, २ तरूणांचा जागीच मृत्यू

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांनी फर्निचर पुरवठादाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडलं होतं. महाविद्यालयाच्या फर्निचर पुरवठादाराकडे आरोपींनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळाली होती, त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत या दोघा अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले होते. महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचर पुरवठादाराचे दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती. ⁠

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com