Pune Man End Life Samm Tv
मुंबई/पुणे

Pune News: धावत्या बससमोर उडी मारून एकाची आत्महत्या, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू; पुण्यात खळबळ

Pune Man End Life: पुण्यामध्ये एका तरुणाने पीएमपीएमल बसच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. चाकाखाली चिरडून या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

Summary:

  • पुण्यात धावत्या बससमोर उडी मारून तरुणाची आत्महत्या

  • बंडगार्डन पुलावर घडली आत्महत्येची घटना

  • पीएमपीएमएल बसखाली चिरडून व्यक्तीचा मृत्यू

  • लक्ष्मीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये पीएमपीएमल बससमोर उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली. पुण्यातील बंडगार्डन पुलावर ही घटना घडली. बसच्या मागच्या चाकाखाली चिरडून या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील बंडगार्डन ब्रिज परिसरात रविवारी पहाटे एक गंभीर घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केली. ११ मे २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी चौकीजवळ केपी जंक्शनकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने धावत्या बसच्या मागील चाकाखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत व्यक्तीचा मृतदेह बाजूस काढून पुढील तपासा सुरू करणयात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. बंडगार्डन ब्रिज परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करत नागरिकांना दिलासा दिला. सध्या अज्ञात मयत इसमाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT