pune shocking news Saam tv
मुंबई/पुणे

खळबळजनक! पिंपरीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांचा आक्रोश

pune shocking news : पुण्याच्या पिंपरीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

गोपाल मोटघरे

पुण्याच्या पिंपरीत घडला धक्कादायक प्रकार

फुगेवाडीतील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू

५ जणांच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ

पुणे जिल्ह्यातील पिंपरीतील फुगेवाडीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंपरीच्या फुगेवाडी परिसरात बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांत एकामागोमाग पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फुगेवाडीतील एक-दोन जण गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनांमुळे फुगेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हातभट्टी दारूच्या सेवनामुळे हे मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

फुगेवाडी परिसरातील काही नागरिकांचा अल्पावधीत मृत्यू झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आल आहे. फुगेवाडी परिसरात हातभट्टी दारूच्या सेवनामुळे विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातभट्टी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या चर्चेला दुजोरा नसल्याचे सांगितल तसेच वाय सी एम हॉस्पिटलमध्ये देखील अजूनपर्यंत विषारी दारूमुळे कुणाचा मृत्यू झाल्याची माहिती नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाले, याची माहिती देखील दापोडी पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.

तत्पूर्वी, सर्व प्रकरण स्वतंत्र आहेत. पाच पैकी ४ जणांचा दारू पिण्याचा कुठलाही इतिहास नाही. परंतु या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वत: दापोडी वाय सी एम हॉस्पिटल येथे स्वतः हजर झाले. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू झाला आहे.

मृतांची नावे आली समोर

पांडुरंग सदाशिव फुगे (वय 57)

विजय प्रकाश राठोड (वय 31)

राजेंद्र प्रकाश राठोड (वय 34)

राजेंद्र राजपूत (वय 51)

अकबर पठाण (वय 52)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'50 कोटींचं डील, 15 कोटी अ‍ॅडव्हान्स'; खासदारांना हमीभाव, संजय राऊतांचा आरोप

Omraje Nimbalkar: हक्काचे खासदार ओमराजेंनी का सोडली ठाकरेंची साथ?, 'कोर्टाच्या निकालासाठी ओमराजे फुटले'

ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार? राष्ट्रवादीचे 3 खासदार NDAच्या संपर्कात?

Operation Tiger: पुन्हा शिवसेना फोडली! 6 खासदाराचं शिंदेसेनेत विलिनीकरण होणार? खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरेसेनेची रणनीती

Operation Tiger: ४ वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर; वाचा'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT