pune news  Saam tv
मुंबई/पुणे

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

pune crime news : नसरापूरनंतर पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

५० वर्षीय व्यक्तीने ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने नागरिकांचा संताप

पुण्यातील पर्वती भागात घडला संतपाजनक प्रकार

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात ५० वर्षीय व्यक्तीकडून बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती भागात ही घटना घडली. या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर नागरिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती भागात ५० वर्षीय व्यक्तीने बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नागरिकांनी वेळीच घटना पाहिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर नागिरक थेट पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले.

नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नेमकी घटना काय आहे, याबाबत कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्यात अत्याचाराच्या घटना वाढल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात पर्वती भागात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. ५० वर्षीय व्यक्तीने मुलीचे कपडे काढत लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. नागरिकांनी संपूर्ण प्रकार पाहिल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी पीडित मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनबाहेर जमले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरीरातलं पाणी कमी झाल्यास दिसतात 'ही' ५ लक्षणं, वेळीच द्या लक्ष नाहीतर...

Kidney Health Tips: किडनी खराब करतात तुमच्या या 5 सवयी, वेळीच करा बदल अन्यथा...

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप! ठाकरे गटानंतर आता शरद पवारांनाही धक्का? खासदार NDA च्या संपर्कात

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात 15 दिवसांनी एक तास पाणी; हजारो महिलांचा घागर मोर्चा, प्रशासनाला घेराव

Food Safety: तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचं कारण; FSSAI च्या नव्या आदेशाने वाढली चिंता

SCROLL FOR NEXT