शरीरातलं पाणी कमी झाल्यास दिसतात 'ही' ५ लक्षणं, वेळीच द्या लक्ष नाहीतर...

Manasvi Choudhary

डिहायड्रेशन

कोणताही आजार होण्याआधी शरीरल संकेत देतं जे तुम्ही वेळीच ओळखणे महत्वाचे आहे. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुमचे शरीर संकेत देते ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Low Water Levels Signs

सुरूवातीची लक्षणे कोणती?

डिहायड्रेशनच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे आपण थकवा किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्ष करतो मात्र पाण्याअभावी शरीराच्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो. डिहायड्रेशनचा त्रास हा केवळ शरीरावर नाही तर मेंदू, हृदय आणि शरीराच्या इतर अवयवांवरही होऊ शकतो.

Dehydration Early Warning Signs

तोंड, ओठ आणि घसा कोरडा पडणे

शरीरात पाणी कमी असल्यास लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे तोंड सुकणे, ओठ फुटणे आणि घसा सतत कोरडा पडणे या समस्या जाणवू लागतात.

Dry Mouth And Lips | saam tv

लघवीचा रंग बदलणे

जर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी असेल, तर याचा अर्थ शरीरात पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे

Dark Urine | Google

डोकेदुखी आणि चक्कर येणे

पुरेसे प्रमाणात पाणी न प्यायल्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो मेंदू आकुंचन पावतो ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे या समस्या होतात.

Headache & Dizziness

हृदयाचे ठोके अचानक वाढणे

शरीरात पाणी कमी झाले की रक्ताचे प्रमाण कमी होते आणि रक्त घट्ट होते. यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण करण्यासाठी हृदयाला वेगाने पंप करावे लागते, परिणामी हृदयाचे ठोके अचानक वाढतात

Increased Heart Rate

त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे

डिहायड्रेशनचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. त्वचेची लवचिकता कमी होते यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते.

Dry & Dull Skin

सतत तीव्र तहान लागणे

जर तुम्हाला पाणी प्यायल्यानंतरही वारंवार तहान लागत असेल, तर हे डिहायड्रेशनचे लक्षण आहे. शरीर तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा संकेत देतो.

Constant Thirst | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मधुमेह कंट्रोलमध्ये आणेल 'हे' एक ड्रिंक, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या

Boosts Insulin Efficiency
येथे क्लिक करा,...