मधुमेह कंट्रोलमध्ये आणेल 'हे' एक ड्रिंक, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूड खाण्याची सवय यामुळे मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू शकते.

Diabetes | pinterest

शरीराच्या या भागावर होतो परिणाम

डायबिटीज आजाराची लक्षणे आपल्याला दिसत नसली तरी रक्तातील साखर अचानक वाढली आणि ती वेळेवर नियंत्रित केली पाहिजे नाहीतर त्याचा थेट परिणाम शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या भागांवर जसे की किडनी, हृदय आणि डोळ्यांवर होतो.

Diabetes | google

घरगुती उपाय

डायबिटीजच्या रूग्णांसाठी एक घरगुती उपाय प्रभावी ठरणार आहे तो म्हणजे मेथीच्या दाण्याचे पाणी.

Fenugreek Water for Diabetes

इन्सुलिनची क्षमता वाढते

मेथीच्या दाण्यांमध्ये 'हायड्रॉक्सिसोलेउसीन' द्रव असते. जे शरीरातील स्वादुपिंडाच्या पेशींना उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती आणि कार्यक्षमता नैसर्गिकरित्या वाढते.

Boosts Insulin Efficiency

मेथीचे पाणी कसे बनवावे?

१) रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाण्यात मेथीचे दाणे भिजत घाला.

२) सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्यावे. भिजवलेले मेथी दाणे चावून खाल्ल्याने देखील तुम्हाला फायदा होतो.

Natural Sugar Control drink

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: कानामध्ये 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा बहिरेपणा येणारे; वेळीच ओळखा, नाहीतर...

Asking to Repeat
येथे क्लिक करा...