Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्याच्या तापमानात देखील होणार वाढ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंचे 7 खासदार फुटण्याची शक्यता, अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live Updatesaam tv

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय.

- पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांचे व्यापक ‘सेफ्टी ऑडिट’ केले जाणार.

- धोकादायक इमारती, वर्गखोल्या व स्वच्छतागृहांचा वापर तातडीने बंद करण्याचे निर्देश.

- विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्या व ग्रामपंचायतींवर.

- २७ कलमी मान्सूनपूर्व सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार.

पंढरपुरात मध्यरात्री दुकांना आग

पंढरपूर शहरातील काही दुकांनाना मध्यरात्री अचानक लागली‌.

या आगीमध्ये चार चपलांची तर चार किराणा अशी आठ दुकाने आगीत जळून खाक झाली.

यामध्ये मोठी आर्थिक हानी झाली आहे.

दरम्यान अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

तुळजाभवानी मंदिरातून दोन वेळा चोरी गेलेला चांदीचा मुकुट परत पोलिसांच्या ताब्यात

तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरात दोन वेळा चोरी गेलेला चांदीचा मुकुट आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातील मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्याच्या तापमानात देखील होणार वाढ

राज्यातील अनेक भागातील पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे दुसरीकडे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

छत्रपती संभाजीनगर: लाखोंचे एम.डी. ड्रग्स जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने झाल्टा फाट्याजवळ सापळा रचून एम.डी. म्हणजे मेफेड्रोन पावडरची तस्करी करणाऱ्या दोन आंतरराज्यीय पेडलर्सना रंगेहात अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ६२.२७ ग्रॅम घातक ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत २ लाख ४९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बीड बायपास रोडवर पांढऱ्या रंगाच्या कारची नाकेबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली. या छाप्यात ड्रग्जसह कार, मोबाईल आणि डिजिटल वजनकाटा असा एकूण ७ लाख ३९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भाजीपाल्याची आवक तब्बल ४० टक्क्यांनी घटली

त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक तब्बल ४० टक्क्यांनी घटल्याने बाजारात दर वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्या, टोमॅटो, भेंडी, गवार, सिमला मिरची यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. कांदा आणि बटाट्याच्या किमतीतही वाढ झाल्याने दैनंदिन स्वयंपाक अधिक महाग झाला आहे.

•टोमॅटो - ₹80

* गवार ₹80

* भेंडी- ₹80

* सिमला मिरची- ₹80

* वांगे -₹60

* फ्लॉवर -₹80

* पत्ताकोबी - ₹50

* शेवगा शेंगा -₹90

* कांदा -₹20

•बटाटा - ₹30

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com