Kidney Health Tips: किडनी खराब करतात तुमच्या या 5 सवयी, वेळीच करा बदल अन्यथा...

Sakshi Sunil Jadhav

किडनीचे महत्व

किडनी शरीरातला विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं महत्वाचं काम करते. पण आपल्या रोजच्या सवयींमुळे नकळक किडनी निकामी होऊ शकते.

kidney care tips | google

शरीरावर होणारा परिणाम

किडनी खराब झाली की शराराचं संपूर्ण गणितच बदलतं.बऱ्याच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे वेळेआधीच तुमच्या सवयींमध्ये पुढील प्रमाणे बदल करा.

healthy kidneys

पुरेसं पाणी पिणं

शरीरात पाण्याची कमतरता असल्यावर किडनीला विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याने किडनी स्टोन आणि किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

kidney stone prevention

जास्त मीठ खाणे

जेवणात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. वाढलेला रक्तदाब किडनीवर ताण आणतो आणि ती हळहळू निकामी होते.

prevent kidney failure

जास्त पॉवरची औषधे

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही पेनकिलर घेणं धोकाचं ठरू शकते. त्यामुळे किडनीच्या ऊतींना हानी पोहोचू शकते.

kidney health awareness

लघवी जास्त थांबवून ठेवणं

लघवी बराचवेळ थांबवून ठेवल्याने मूत्रमार्गावर दबाव वाढ जातो. त्यामुळे संसर्ग होण्याची आणि किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यताही वाढते.

sedentary lifestyle risks

साखरेचं जास्त सेवन

रोज गोड पदार्थ खाल्याने डायबेटीज वाढते. डायबेटीज किडनीच्या आजारांचे एक प्रमुख कारण मानलं जातं.

sedentary lifestyle risks

हालचाल न करणं

बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढला आहे. या दोन्ही गोष्टी किडनीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

sedentary lifestyle risks

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

kidney detox naturally

NEXT: Blood Pressure Tips: चहा प्यायल्यानंतर BP तपासताय? सावधान! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

blood pressure reading
येथे क्लिक करा