Sakshi Sunil Jadhav
ब्लड प्रेशर मोजताना अनेकजण काही साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण त्याने BP चं रीडिंग चुकीचं येतं. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अचूक रक्तदाब मोजण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
रक्तदाब तपासण्याआधी चहा-कॉफी घेऊ नका. कारण चहा किंवा कॉफीतलं कॅफिनमुळे ब्लड प्रेशर तात्पुरतं वाढलेलं दिसतं.
BP मोजण्याआधी शरीराला विश्रांती मिळणं गरजेचं आहे. किमान पाच मिनिटं शांत बसल्यानंतरच बीपी तपासा.
पाठ खुर्चीला टेकवून बसा आणि पाय जमिनीवर सरळ ठेवा. चुकीच्या पोझिशनमुळे BP चं रीडिंग बदलेल.
पाय क्रॉस करून बसल्यावर रक्तदाब वाढलेला दिसू शकतो. त्याने प्रत्यक्षापेक्षा जास्त BP नोंदवला जाऊ शकतो.
BP मोजताना बोलल्यावर रेडींगवर प्रभाव पडतो. म्हणून मोजणी सुरू असताना पूर्ण शांत राहाण्याचा प्रयत्न करा.
तपासणीच्या 30 मिनिटं अगोदर धूम्रपान किंवा व्यायाम करू नका. नाहीतर रक्तदाब तात्पुरता वाढण्याची शक्यता आहे.
ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कफचा आकार योग्य असणं गरजेचं आहे. चुकीचा कफ वापरल्यावर रीडिंग अचूक येत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.