pune swargate bus depot News 
मुंबई/पुणे

Pune Crime : शिवशाही बलात्कार प्रकरणातील नराधमाचे राजकीय कनेक्शन, पोलिसांसोबत संपर्क

Pune dattatray gade News : स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकऱणातील आरोपी दत्ता गाडे याचे राजकीय कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Namdeo Kumbhar

pune swargate bus depot News : स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दत्ता गाडे याच्या मागावर पोलिसांच्या १३ तुकड्या आहेत, पण ४८ तासानंतरही त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. दत्ता गाडे याचे राजकीय कनेक्शन समोर आले आहेत, त्याशिवाय तो आधी पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कातही असल्याचे तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्र टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. ("Pune Rape Case: Political and Police Connections of Accused Surface Amid Investigation")

२६ वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे एका प्रमुख लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात काही राजकीय व्यक्तीही होत्या. पोलिसांसोबतही तो संपर्कात असायचा, असे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, दत्ता गाडे हा पीएमपी एसटी स्थानकात वावरत असायचा अन् तेथील तरूणी अन् महिलांना पोलिस असल्याचे भासवत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा, असेही तपासात समोर आले आहे.

दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून बलात्कारच्या घटनेव्यतिरिक्त त्याने अनेक मुलींना जाळ्यात ओढलं असेल, असा संशय पुणे पोलिसांना आहे. गाडे याच्या संपर्कात असणाऱ्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गाडे याचा फोन स्ट्रेस करण्यात आला आहे, त्याने संपर्क केलेल्या २० जणांची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे.

राजकीय फ्लेक्सवर गाडेचा फोटो -

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे राजकीय फ्लेक्सवर फोटोही समोर आलेले आहेत. पुण्यातील शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दत्तात्रय गाडे याचा फोटो दिसत आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्स वर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो आढळला आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडे याचा फोटो लावण्यात आलेला आहे. दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

dattatray gade

दत्ता गाडे हा सातत्याने स्वारगेट बस स्थानकात मुली अन् महिलांना छेडत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेय. यापूर्वीही स्वरगेट बस स्थानकात महिला अन् मुलीच्या छेड काढली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना आल्या होत्या. गाडे हा स्वत:ला पोलिस असल्याचे भासवत असे अन् जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. २५ फेब्रुवारी रोजी गाडे याने फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय तरूणीला जाळ्यात ओढलं अन् शिवशाहीमध्ये तिच्यावर अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT