Pune Cyber Police investigating a case where a 62-year-old woman was duped of ₹99 lakh through a fake ED digital arrest scam. Saam Tv
मुंबई/पुणे

ED चं खोटं पत्र, अर्थमंत्र्यांच्या नावानं वॉरंट; पुण्यातल्या महिलेची ९९ लाखांची फसवणूक

Digital Arrest Cyber Fraud Targeting: पुण्यात ६२ वर्षीय महिलेची ईडीचे खोटे पत्र आणि डिजिटल अरेस्टचा बहाणा करून ९९ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane, Akshay Badve

पुण्यात ६२ वर्षीय महिलेची ९९ लाख रुपयांची सायबर फसवणूक

ईडीचे खोटे पत्र आणि अर्थमंत्र्यांचे नाव वापरून चोरट्यांनी घातला गंडा

"डिजिटल अरेस्ट" चा बहाणा करत खात्यातील पैसे लांबवले

पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

पुणे सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संगीता देवकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेला एक फोन आला. त्यावर त्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी जॉर्ज मॅथ्यू तुमच्याशी बोलतील असं सांगण्यात आलं.

काही वेळातच त्यांना आणखी एका नंबर वरून फोन आला आणि "तुमच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल आहेत" अशी बतावणी केली गेली. तसेच तुमच्यावर मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल असून तुमच्या विरोधात ई डी ने पत्र काढलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वॉरंट काढलं आहे असं तोंडी सांगितलं

तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही विनंती करा" असं सायबर चोरट्यांनी पीडित महिलेला सांगितलं. काही दिवसांनी परत पीडित ज्येष्ठ महिलेला फोन करण्यात आला आणि तिथून त्यांच्यावर डिजिटल अरेस्टचे जाळे टाकण्यात आले. तुमचं खातं मनी लाँड्रिंग मध्ये असल्याचं भासवत त्यांना भीती दाखवण्यात आली.

सायबर चोरट्यांनी एक व्हिडिओ कॉल वर त्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती मागवली आणि त्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली. तसेच याबद्दलची माहिती कोणाला ही देऊ नका असे सांगितलं आणि पैसे मिळाल्याच्या काही खोट्या पावती त्यांना पाठवण्यात आली. वेळोवेळी त्यांच्या खात्यातून पैसे काढल्यावर आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसात धाव घेतली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT