Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ

Kalyan Crime News : कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणाऱ्या तोतया युवकाला पोलिसांनी अटक केली. लग्न जमवण्यासाठी आणि पोलिस बनण्याच्या नादात त्याने आरपीएफचा गणवेश परिधान केला होता. चौकशीत त्याने गेल्या चार महिन्यांपासून स्वतःला अधिकारी म्हणून सादर केल्याची कबुली दिली आहे.
Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ
Kalyan Crime News Saam Tv
Published On
Summary

तरुण आरपीएफ गणवेशात कल्याण स्टेशनवर फिरताना पकडला गेला

त्याने पोलिस बनल्याचं सांगून गावात स्वतःचा सत्कारही करून घेतला होता

सेल्फी मागताना संशय आल्याने खऱ्या अधिकार्‍याने त्याचा पर्दाफाश केला

पोलिसांनी त्याला अटक करून फसवणुकीचा तपास सुरू केला आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या तोतया आरपीएफ अधिकाऱ्याला अखेर कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश जाधव (रा. भूम, जि. धाराशिव) असे या तरुणाचे नाव असून पोलिस बनण्याची क्रेझ आणि लग्न जमवण्यासाठी केलेले कृत्य त्याला भलतेच महागात पडले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अविनाश जाधव हा शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. पोलिस विभागात कार्यरत असलेल्या मित्रमंडळींमुळे त्याला पोलिस बनण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. मात्र चांगली नोकरी न मिळाल्याने लग्न जमत नसल्याने त्याने आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश विकत घेऊन स्वतःला आरपीएफ जवान असल्याचे सांगणे सुरू केले.

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ
Winter Update : हुडहुडी वाढली! तापमान २ ते ८ अंशांनी घसरलं, मुंबई पुण्यासह राज्यात गुलाबी थंडी

गेल्या चार महिन्यांपासून अविनाश रेल्वेतून प्रवास करत, स्वतःला आरपीएफ अधिकारी म्हणून सादर करत होता. इतकेच नव्हे तर आपल्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांनाही तो आरपीएफमध्ये भरती झालो असे सांगत होता. त्याच्या या भरतीच्या बातमीनंतर ग्रामस्थांनी त्याचा सत्कारही केला होता.

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ
NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

मात्र त्याचे नशीब एवढेच साथ देणारे ठरले. काल दुपारी कल्याण रेल्वे स्थानकावर अविनाश आरपीएफच्या गणवेशात फिरत असताना खरे आरपीएफ अधिकारी रामेशसिंग यादव यांच्याशी तो बोलू लागला. बोलताना त्याने यादव यांच्यासोबत सेल्फी घेण्याची मागणी केली. यादव यांना त्याच्या बोलण्यावर आणि युनिफॉर्मवर संशय आल्याने त्यांनी ओळखपत्र विचारले. मात्र अविनाशकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. चौकशीत तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले आणि यादव यांनी तातडीने कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ
KDMC Election : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या १२२ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे काय आरक्षण?

पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गेल्या काही महिन्यांपासून आरपीएफ अधिकारी असल्याचे भासवून रेल्वे स्टेशन आणि गाड्यांमध्ये मुक्तपणे वावरत असल्याचे उघड झाले. त्याने मुंबई सीएसएमटी येथे जाऊन पोलिसांसोबत सेल्फीही काढले होते. कल्याण रेल्वे पोलिसांनी अविनाश जाधव याला अटक केली असून, त्याने या दरम्यान कोणाची फसवणूक केली आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com