Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये

Akola Crime : अकोल्यात सायबर ठगांनी पाणीबिलच्या नावाखाली फसवणूक केली. फक्त १० रुपये ऑनलाईन भरणाऱ्या महिलेला तब्बल १ लाख रुपयांचा फटका बसला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये
Akola CrimeSaam Tv
Published On
Summary

अकोल्यात व्हॉट्सअ‍ॅपवर पाणीबिल अपडेटचा खोटा मेसेज पाठवण्यात आला

फक्त १० रुपये भरणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचा तोटा झाला

तीन नागरिकांना अशाच पद्धतीने गंडवण्यात आले

पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोलेकरांनो सावधान! तुम्हांला व्हाट्सअ‍ॅपवर अकोला महापालिकेच्या लोगोसह १० रुपये भरून पाणी बिल अपडेट करा, नाहीतर पाइपलाइन तोडणार' असा मेसेज आला असेल तर सतर्क व्हा. कारण, अकोल्यात सायबर गुन्हेगारांनी ३ जणांना गंडवून बँक खाती रिकामी केली आहेत. एका महिलेच्या स्टेट बँकेच्या खात्यातून १ लाख ७ हजार रुपये लंपास केले आहे. तसेच अन्य २ दोन जणांना अशाच पद्धतीने गंडवण्यात आलं आहे. हा फसवणुकीचा प्रकार अकोल्यातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोल्यातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपवर 7583891729 या क्रमांकावरून मेसेज आला. या मेसेजवर अकोला महापालिकेचा लोगो वापरलेला होता. या मेसेजमध्ये 'तुमचं मागील महिन्याचं पाणीकर बिल भरलेले नाही, त्यामुळ पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तोडण्यात येईल, 'अशी स्पष्ट धमकी देण्यात आली. यासोबतच, हा मेसेज खरा वाटावा म्हणून 'पाणीपुरवठा पाइपलाइन अधिकारी' म्हणून देवेश जोशी नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबरही दिला होता.

Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये
Shocking : गर्लफ्रेंडशी बोलल्याने बॉयफ्रेंडला खटकलं; रागाच्या भरात शाळेतील बेस्टफ्रेंडला संपवलं

फसवणूक झालेल्या महिला रत्नाकला भगत यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेज वाचला. या मेसेज मध्ये 'मी तुम्हाला लगेच बिल पाठवतो, पण त्याआधी तुम्ही फक्त १० रुपये ऑनलाइन पाठवा' असे सांगितले. महिलेने ऑनलाइन १० रुपये भरताच दोन ट्रान्झेक्शन झाले. पहिले ट्रान्झेक्शन ६५ हजार ६६३ रुपये तर दुसऱ्या ट्रान्झेक्शनमध्ये ३५ हजार रुपये गायब झाले.

Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये
EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

याशिवाय एका महिलेच्या स्टेट बँकेच्या खात्यातून १ लाख ७ हजार रुपये लंपास केले आहे. तसेच अन्य २ दोन जणांना अशाच पद्धतीने गंडवण्यात आलं आहे. या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. शिवाय या प्रकारच्या घटनांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com