उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे मित्राने मित्राची स्कार्फने गळा दाबून हत्या केली
गर्लफ्रेंडशी इंस्टाग्रामवर बोलल्याने आरोपी संतापला होता
पोलिसांनी आरोपी मनोज आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले
या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे
उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली. गर्लफ्रेंडशी इंस्टाग्रामवर बोलला म्हणून एका तरुणाने जवळच्या मित्राची स्कार्फने गळा दाबून हत्या केली आहे. सदर घटना ६ डिसेंबर रोजी घडली असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या हत्येनंतर गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील फतनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील नारायणपूर कला गावात सदर घटना घडली. मनोज (नाव बदलेल) आणि सनी (नाव बदलेल) ही दोन मुलं एकमेकांचे घट्ट मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद उफाळला. मनोजच्या गर्लफ्रेंडशी सनीने इंस्टाग्रामवर चॅट केल्याने दोघात वाद झाला.
संतापलेल्या मनोजने ३ मित्रांना हाताशी घेऊन सनीचा काटा काढला. शाळा सुटल्यावर गावातील शेतात नेवून स्कार्फने गळा दाबून हत्या केली. आणि नंतर त्याचा गळा दाबला. सनीचा मृत्यू झाल्यानंतर मनोजने सनीचा मृतदेह शेतात टाकून मित्रांसह पळ काढला. दिवस संपत आला तरी सनी घरी परतला नसल्याने सनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शुक्रवारी सकाळी म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी सनीचा मृतदेह भातशेतीत सापडल्याचा पोलिसांना फोन आला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेतली. सनीचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच घटनास्थळावरुन मोबाईल, चेन, शाळेचा आयडी, हत्येसाठी वापरलेला स्कार्फ पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणाची तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या प्रकरणाचे धागेदोरे सोडवत पोलीस मनोज आणि त्याच्या मित्रांच्या चौकशीपर्यंत आले. या चौकशीत मनोजने केलेलं धक्कदायक कृत्य समोर आलं. मनोजने त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली असून माझ्या गर्लफ्रेंडशी बोलला म्हणून त्याची मी हत्या केली असं मनोज म्हणाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी मनोजला सुधारगृहात पाठवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.