Pune Saam
मुंबई/पुणे

Pune Viral News: पुणे-सातारा महामार्गावर तरूणांची हुल्लडबाजी, मध्यरात्री गाणी लावून डान्स अन् धावत्या कारमध्ये धिंगाणा

Youths Hang out of Car Windows on Pune-Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर नवले ब्रिज ते कात्रज नवीन बोगदा दरम्यान, १६ एप्रिलच्या रात्री १२:३० च्या सुमारास काही तरुणांनी कायद्याला धाब्यावर बसवत धक्कादायक प्रकार केला.

Bhagyashree Kamble

पुणे सातारा महामार्गावर तरूणांनी कायद्याला धाब्यावर बसवत हुल्लडबाजी केली आहे. सध्या तरूणांचा हा हुल्लडबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महामार्गावर चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघून काही तरूणांनी व्हिडिओ शूट केला आहे. तसेच कारमध्ये सुरू असलेल्या गाण्यावर डान्स देखील केला आहे.

तरूणांची हुल्लडबाजी नवले ब्रिज ते कात्रजच्या नवीन बोगदा या दरम्यान सुरू होती. यावेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडिओ शूट करून शेअर केला. तरूणांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं काय?

पुणे सातारा महामार्गावर नवले ब्रिज ते कात्रजचा नवीन बोगदा या दरम्यान, १६ एप्रिलला रात्री १२:३० च्या सुमारास तरूणांनी जीव धोक्यात घालणारी हुल्लडबाजी केली. महामार्गावरील मुख्य २ लेनवर कारच्या खिडकीमधून बाहेर येत तरूणांनी धिंगाणा घातला. तसेच इतरांचा जीव घालण्याचा प्रयत्न केला. तरूणांनी चालत्या कारमध्ये धक्कादायक स्टंट केले.

व्हिडिओमध्ये तरूणांची हुल्लडबाजी कैद

महामार्गावरून जाणाऱ्या एका सजग नागरिकाने या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये २ कार दिसत आहेत. काही तरूण २ विविध कारमधून हु्ल्लडबाजी करताना दिसत आहेत. काही तरूण खिडकीच्या बाहेर डोकावून धिंगाणा घालत आहेत. तर, काही जण कारमध्ये गाणी लावून डान्स करताना दिसत आहेत. हे दृश्ये कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली आहे. तरूणाने हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे.

कायद्याचे उल्लंघन

चालत्या गाडीतून अशा प्रकारे बाहेर येऊन हुल्लडबाजी करणं केवळ स्वत:च्याच नाहीतर, इतरांच्या जीवाशीही खेळण्याचाही हा प्रकार आहे. व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी या घटनेवर त्वरित लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT