
बदलापूर येथील घटनेची रायगडमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या २ चिमुकलींवर स्कूल बसमधील क्लिनरने लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीच्या पालकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनुसार, आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
करण दीपक पाटील असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मौजे वदप गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी क्लिनर गेल्या वर्षभरापासून मुलींसोबत हे दुष्कृत्य करत होता. आरोपी ड्रायव्हरच्या सीटवर चिमुकलींना मांडीवर बसवून त्यांच्या शरीरावर अश्लीलरित्या स्पर्श करत होता. तसेच त्यांना धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे. धमावल्यामुळे पीडित चिमुकल्यांनी पालकांना याची माहिती दिली नाही.
मात्र, एका चिमुकलीच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर पालकांनी रूग्णालयात नेले असता, हे प्रकरण समोर आले. नंतर पालकांनी या प्रकरणाचा जाब बस मालकाला विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्याने जबाबदारी नाकारली. राजकीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. नंतर पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस ठाण्यात गुन्हा सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले. मात्र, एफआयआरची प्रत रात्री अकरा वाजेच्या दरम्यान देण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं. या प्रकाराला गुन्हेगारासहित बस मालक देखील जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.