Crime: अमेरिकेत असल्याचं सांगायचा आणि.., अनेक महिलांशी अनैतिक संबंध अन् गंभीर आजार, पत्नीचा पतीवर गंभीर आरोप

Noida Woman Seeks Police Help Against Husbands Harassment: नोएडामधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या पती आणि सासरच्यांविरोधात मानसिक व शारीरिक छळ, तसेच फसवणूक आणि अनैतिक संबंधांचे आरोप केले आहेत.
Crime
Crime Saam
Published On

नोएडामधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या पती आणि सासरच्यांविरोधात मानसिक व शारीरिक छळ, तसेच फसवणूक आणि अनैतिक संबंधांचे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पती कामाचे नाव सांगून, दुसऱ्या शहरात राहत होता. अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. आजारी पडल्यावर पुन्हा भारतात परतला. तसेच महिलेवर बाळ होत नसल्याचा आरोप केला. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न २०१३ साली झाले होते. लग्नानंतर पती तिच्या कमाईवर अवलंबून होता. नंतर माझ्या वडिलांची एफडी मोडून हुंडा घेतला. नंतर पती अमेरिकेत कामाच्या निमित्ताने गेला. तिथेच स्थायिक झाला. नंतर पीडितेशी संपर्क तोडण्यास सुरुवात केली.

Crime
Crime: प्रेम करणं गुन्हा ठरला! 'मी आई होणार...'; प्रेमविवाह केलेल्या गरोदर मुलीला आईने संपवलं

महिला नंतर अमेरिकेत गेली. तेव्हा तिला पती इथे नसून, दुसऱ्या शहरात राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच पतीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. नंतर पती आजारी पडला आणि तो पुन्हा भारतात परतला.

Crime
Ayodhya: 'मंदिराची सुरक्षा वाढवा, अन्यथा...'; राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

जेव्हा पत्नीने पतीला याचा जाब विचारला. तेव्हा पतीने पीडितेवर बाळ होत नसल्याचा आरोप केला. तसेच नियमित टोमणे मारून पीडित महिलेला मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. नंतर पीडित महिलेला घराबाहेर काढण्यात आले. महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com