Crime: प्रेम करणं गुन्हा ठरला! 'मी आई होणार...'; प्रेमविवाह केलेल्या गरोदर मुलीला आईने संपवलं

Mother Kills Daughter in Andhra Pradesh: समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, या भीतीपोटी एका आईने आपल्या पोटच्या १६ वर्षांच्या मुलीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात समोर आली आहे.
crime update
crime update saam tv
Published On

दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्यामुळे आणि गर्भवती राहिल्यामुळे एका निर्दयी आईने आपल्याच पोटच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील? या भीतीपोटी आईने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

१६ वर्षांची मुलगी ही गेल्या ३ वर्षांपासून २० वर्षीय मुलावर प्रेम करत होती. दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. या नात्याची माहिती त्यांच्या परिवाराला समजताच, त्यांनी या नात्याला कडाडून विरोध केला. मात्र, दोघांनीही गेल्या वर्षी कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केलं.

crime update
Crime: धक्कादायक! २ अल्पवयीन मुलींवर नराधमांकडून अत्याचार; संतप्त गावकऱ्यांकडून पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक

जेव्हा मुलगी गर्भवती राहिली, तेव्हा आईला संताप अनावर झाला. तिने मुलीच्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तरूणाच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली. पत्नी आपल्या पतीला नियमित तुरुंगात भेटायला जायची.

crime update
Congress: 'निवडणुकीचे तिकीट देतो, हॉटेलमध्ये ये' काँग्रेस महिला कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार

नंतर आईने रागाच्या भरात आपल्या मुलीचे जबरदस्तीने गर्भपात करायला लावले. एका महिन्यानंतर तरुणाची जामीनावर सुटका झाली. तेव्हा मुलीला त्याला भेटायचे होते आणि बोलायचे होते. पण आईला ही गोष्ट पटत नव्हती. तिने रागाच्या भरात पोटच्या मुलीचे हात आणि तोंड दाबून मुलीची हत्या केली.

घाईघाईत आईने मुलीचे अंत्यसंस्कारही केले. गावकऱ्यांना संशय आला. त्यानंतर आई फरार झाली. गावातील एका अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला आणि आईला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com