Crime: धक्कादायक! २ अल्पवयीन मुलींवर नराधमांकडून अत्याचार; संतप्त गावकऱ्यांकडून पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक

Minor Girls Assaulted in Chandrapur Chimur: चिमूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली. संतप्त गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनबाहेरच दगडफेक केली.
Chandrapur
ChandrapurSaam
Published On

आता एक संतापजनक बातमी चंद्रपूरमधून समोर येत आहे. चंद्रपूरच्या चिमूर येथे २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला. अत्याचार केल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याबाहेर घेराव घालत अत्याचाराबाबत आवाज उठवला. त्यामुळे परिसरात तीव्र तणाव निर्माण झाले होते. नराधमांना तातडीने ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर धडक दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

चिमूरमध्ये २ अल्पवयीन मुलींवर २ नराधमांनी अत्याचार केला. याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घेराव घातला. तसेच नराधमाला तातडीने ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक केली. या दगडफेकीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस आणि गृहरक्षक दलाचे काही जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

Chandrapur
Crime: बापाला कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडलं, रागाच्या भरात लेकावर गोळ्या झाडल्या; मुलगा रक्तभंबाळ

यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही काही युवक जखमी झाल्याची माहिती आहे. जमावाच्या आक्रमकतेमुळे परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या. तसेच शेजारील पोलीस ठाण्यातूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला.

Chandrapur
Nashik : आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत अनर्थ, २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू; डीजेमुळे नाका तोंडातून रक्तस्राव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाला शांत करण्याचाही प्रयत्न केला. सध्या पोलीस या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com