Crime: बापाला कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडलं, रागाच्या भरात लेकावर गोळ्या झाडल्या; मुलगा रक्तभंबाळ

Father Shoots Son Over Call Girl in Prayagraj: प्रयागराजमधील कालिंदीपुरम येथील मौसम विहार कॉलनीत एका वडिलांनी स्वतःच्या मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime
Crime
Published On

कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडल्यामुळे बापाने आपल्याच मुलावर गोळी झाडली आहे. ही धक्कादायक घटना धुम्मनगंज पोलिस स्टेशन परिसरातील कालिंदीपुरम येथील मौसम विहार कॉलनीत रात्रीच्या सुमारास घडली आहे. बापावर मुलाने गोळी झाडल्यानंतर कॉल गर्लने तेथून पळ काढला. गोळीबारचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करत कारवाईला सुरुवात केली.

विनोद दुवा असे आरोपीचे नाव आहे. प्रयागराजमध्ये त्यांचं मोठा औषधांचा व्यवसाय आहे. विनोदच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कॉल गर्लमुळे विनोद तिच्यासोबत वेगळं घर घेऊन राहत होता. कॉल गर्लमुळे विनोद परिवाराला वेळ देत नव्हता. घरखर्च आणि शिक्षणालाही पैसे देत नव्हता. कॉल गर्लसोबत नाते तोडण्यासाठी सांगितल्यास घरात वाद सुरू व्हायचा, असं विनोदच्या पत्नीने सांगितलं.

Crime
Scheme: पत्नीच्या नावावर १ लाख रूपये गुंतवा अन् मॅच्युरिटीवर ₹१६००० व्याज मिळवा, सरकारी योजनेचा जबरदस्त फायदा

४ वर्षांपूर्वी विनोदने घर सोडलं. शनिवारी फ्लॅटमध्ये विनोदच्या मुलाने बापाला कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडलं. त्यांच्यात वाद सुरू झाला. हाणामारी झाली. नंतर मुलाने त्याची आई, बहीण आणि मामाला बोलावून घेतलं.

Crime
Local: हार्बर मार्गावर लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांची प्रचंड गैरसोय, वैतागून रूळावरून पायी प्रवास

पत्नी पूजाने जेव्हा कॉल गर्लला घर सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा विनोदने पत्नी आणि मुलांना बेदम मारहाण गेली. रागाच्या भरात पिस्तूल काढली आणि मुलावर गोळ्या झाडल्या. एक गोळी मुलाच्या पायाला लागली. तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विनोदला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com