Harbor
HarborSaam

Local: हार्बर मार्गावर लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांची प्रचंड गैरसोय, वैतागून रूळावरून पायी प्रवास

Harbor Line Passengers Face Inconvenience Due to Train Delay: हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आजचा दिवस अत्यंत त्रासदायक ठरला आहे. कारण गोवंडी ते मानखुर्द दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल मध्येच थांबली आहे.
Published on

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरला आहे. गोवंडी ते मानखुर्द दरम्यान, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल मध्येच थांबली आहे. त्यामुळे संपूर्ण हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे.

रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत असून, या बाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रवासी वैतागून रेल्वे रूळांवरून पुढील प्रवास करत आहेत. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी रेल्वे प्रशासनाकडून यावर काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Harbor
Beed News: 'तुझा मुलगा आमच्या ताब्यात, ५ लाख दे नाहीतर..' बीडमध्ये सिनेस्टाईल मुलाचे अपहरण

ऑफिस सुटण्याची वेळ झालेली आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय झाली आहे. तसेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीला अनेक अनुयायी दादरला जातात. मात्र, लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com