Pune Sassoon Hospital x
मुंबई/पुणे

Pune : पुण्याच्या ससून रुग्णालयात राडा! काचा फोडल्या, मशिन्सची तोडफोड अन् सुरक्षारक्षकाला मारहाण

Pune Sassoon Hospital : पुण्यामधील ससून रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघांनी मिळून रुग्णालयात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयात तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. एका तरुणाने तरुणींच्या साथीने ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घातला. त्यांनी प्रवेशद्वाराची काच फोडली. ईसीजी मशिनची देखील तोडफोड केली. तोडफोड रोखण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षकाला धमकावले, त्याच्याशी धक्काबुक्की केली.

ससून रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी स्वप्नील धनगर (वय २५) आणि राणी पाटील (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी वास्तूची तोडफोड करणे यासाठी दोघांवर कारवाई होणार आहे. सुरक्षारक्षक संदीप जाधव यांनीही दोघांवर मारहाणीप्रकरणी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात आरोपी स्वप्नील धनगर आणि राणी पाटील यांचा नातलग उपचार घेत आहे. मंगळवारी (१५ जुलै) दुपारी एक वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ४० येथे दोघे आले होते. दोघांना त्यांच्या नातलगाला भेटायचे होते. पण नातेवाईकांना भेटण्याची ठराविक वेळ असते. त्यामुळे आता तुम्हाला जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षक जाधव यांनी दोघांना सांगितले.

नातलगाला भेटण्यासाठी परवानगी नाकारल्याने स्वप्नील धनगर आणि राणी पाटील या दोघांनी रुग्णालयात राडा करायला सुरुवात केली. गोंधळ घालू नका असे सांगूनही ते दोघे ऐकले नाही. त्याने सुरक्षारक्षक संदीप जाधव आणि त्याच्या साथीदारांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ देखील केले. दोघांनी काठीने जाधव यांना मारहाण केली. प्रवेशद्वाराची काच फोडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना नोटीस बजावली आहे. लवकरच दोघांवर कारवाई होईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: औषधे आजपासून होणार स्वस्त

Matheran Horses: माथेरानमधील घोड्यांना विचित्र आजाराची लागण|VIDEO

Thane Metro : ठाणेकरांचे मेट्रोचं स्वप्न साकार, आजपासून ट्रायल रन सुरू | VIDEO

Chutney Recipe : वजन वाढले? चपातीसोबत खा 'ही' चटणी, कायम राहाल स्लिम अँड ट्रिम

Navratri Wishes 2025: तू गं दूर्गा, तू भवानी..., शारदीय नवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT