Pune Sadashiv peth Crime News Saam
मुंबई/पुणे

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Pune Sadashiv peth Crime News: चिकन खाल्ल्यानंतर भांडी आणि बेसीन कोण साफ करणार, या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. खडक पोलिसांनी तक्रारीनुसार पाच तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील सदाशिव पेठेत एमपीएससी परिक्षार्थी तरूणींमध्ये राडा.

  • चिकन खाल्ल्यानंतर बेसीन साफ करण्यावरून झालं भांडण.

  • एका तरुणीला पाच जणींनी मिळून बेदम मारहाण.

  • खडक पोलिस ठाण्यात पाच तरुणींवर गुन्हा दाखल.

पुण्यातील सदाशिव पेठेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चिकन खाल्ल्यानंतर बेसीन साफ करण्याच्या वादातून तरूणींमध्ये तुफान राडा झाला आहे. या तरूणी सदाशिव पेठेत वन रूम किचनमध्ये राहत होते. त्या एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरूणींमध्ये भांडण झालं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी चौकशी करून पाच तरूणींवर गुन्हा दाखल केला आहे.

एमपीएससीची परिक्षा पास करून सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. हेच स्वप्न उराशी बाळगून काही तरूणी पुण्यात आल्या. मात्र, याच तरूणींवर चिकन अन् बेसीन साफ करण्याच्या वादातून गुन्हा दाखल झाला आहे. एका तरूणीला ५ जणींनी मिळून बेदम मारहाण केली होती. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणीला एकटीला गाठून इतर पाच तरूणी त्रास देत होत्या. क्षुल्लक कारणावरून वाद घालत होत्या. १४ सप्टेंबर रोजी १० वाजता स्नेहल तक्रारदार महिलेच्या जवळ गेली. 'दुपारी तू चिकन बनवलंय, बेसीन साफ कोण करणार?'असं म्हणत भांडू लागली.

त्यानंतर तक्रारदार तरूणीनं 'बेसीन दुपारीच साफ केले, माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलू नका', असं सांगितलं. त्यानंतर स्नेहलनं तक्रारदार तरूणीला, 'तू मला शिकवणार कसं बोलायचं?'असं म्हणत भीतींवर आदळलं. नंतर तिचा गळा दाबून धरला. इतर चार तरूणींनीही तरूणीच्या कानशिलात लगावली. तसेच खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरूणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करून बाहेर पळ काढला. नंतर खडक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून पाच तरूणींवर गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Politics: जालन्यात काँग्रेसकडून अजित पवारांना झटका, जवळच्या नेत्याने सोडली साथ

Thursday Horoscope: आर्थिक समस्यांचे मिळणार समाधान, अडकलेले पैसे आज परत मिळणार...

Nagpur: '...तर दोन-चार मंत्र्यांना कापा', रविकांत तुपकरांचं खळबळजनक विधान

Phaltan Doctor Death: अखेरच्या सेल्फीमधून धक्कादायक खुलासा; आत्महत्येआधी डॉक्टर तरुणीची दोघांपैकी एकाशी चॅटिंग

IAS, IPS आणि IRS...; निवडणुकीच्या मैदानात उतरले डॅशिंग निवृत्त अधिकारी, कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT