Pranjal Khewalkar Rave Party  Saam Tv
मुंबई/पुणे

Pranjal khewalkar : खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 234 अश्लील फोटो अन् व्हिडिओ, मोलकरणीचाही व्हिडिओ; चाकणकरांची खळबळजनक माहिती

pranjal khewalkar news : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. चाकणकर यांच्या माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडणार आहे.

Vishal Gangurde

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ

रुपाली चाकणकर यांनी सांगितली धक्कादायक माहिती

सचिन जाधव, साम टीव्ही

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगानेही उडी घेतली आहे. महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात खळबळजनक माहिती दिली आहे. प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील 234 फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये मोलकरणीचाही व्हिडिओ आहे, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली.

प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत हादरवणारी माहिती दिली. 'आयोगाला अहवाल मिळाला आहे. पुणे पोलिस आयुक्तांचा अहवाल आयोगाला प्राप्त झाला. 7 आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल अंमली पदार्थ जप्त केले. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये असलेले काही व्हिडिओ मिळाले. यातील चॅटिंग आणि व्हिडिओ माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी, काही शब्द यात उल्लेख करता येत नाहीत असे आहेत. मोबाईल व्हिडिओ फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले'.

'मोबाईलमध्ये 1497 फोटो आहेत. त्यात मुलींचे अश्लील फोटो व्हिडिओ आहेत. त्यात मुलींचे 234 अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.

'मुलींना अंमली पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ काढलेले आहेत. या व्हिडिओचा वापर करून मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. घरात साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचा व्हिडिओ आणि फोटो वाईट अवस्थेतील आहेत. सिनेमात काम देणे आणि इतर प्रलोभन दाखवून मुलींना बोलवले जात होते, असंही चाकणकर यांनी सांगितले.

'या प्रकरणात मानवी तस्करी विरोधी पथक काम करत आहे. या प्रकरणात मुलींचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांच्या अनैतिक मानवी तस्करीच्या विरोधात एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्र दिलं आहे. पुण्यातील पार्टीत महिलांचा अश्लील वापर करण्यात आलाय, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत ठरलं, मविआ नाही तर ठाकरे बंधू एकत्र लढणार, राऊतांची घोषणा, काँग्रेसचे प्रत्युत्तर

Red Fort History: लाल किल्ल्याशी संबंधित 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

Maharashtra Live News Update: पुण्यात पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

Khalid Ka Shivaji: 'खालिद का शिवाजी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठा धक्का; महाराष्ट्र सरकारने केली कारवाई

Raksha Bandhan 2025 : 'हम साथ साथ हैं' ते 'जिगरा'; लाडक्या बहिणीसाठी प्लान करा मूव्ही डेट

SCROLL FOR NEXT