Pune Porsche Car Accident Update Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्वीस्ट; आता पोलिस थेट सुप्रीम कोर्टात जाणार, नेमकं कारण काय?

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिस (Pune Police) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेणार आहे. अपघात प्रकरणातील आरोपी मुलाची सुटका करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आरोपी मुलाची बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आली होती. आता हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधातच पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बाल निरिक्षण गृहातून सुटका करण्यात आली होती. मात्र पुणे पोलिसांनी या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागायचे ठरवले आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाकडून घडलेला गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने पुणे पोलिसांची मागणी मान्य केल्यास आरोपी अल्पवयीन मुलाची पुन्हा बाल सुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावर २५ जून रोजी हायकोर्टात सुनावणी झाली होती. यावेळी हायकोर्टाने अल्पवयीन मुलाला दिलासा देत बाल सुधारगृहातून सुटका करण्याचे निर्देश दिले होते. पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं हे बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने म्हटले होते.

या अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहातून तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले होते. या मुलाची कस्टडी त्याच्या आत्याकडे देण्यात आली आहे. १९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अपघाताची ही घटना घडली होती. यामध्ये कारने दोघांना चिरडले होते. यामध्ये इंजिनिअर तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Chembur Fire News : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

Curd Rice Recipe:रोजच्या पोळी भाजीचा कंटाळा आलाय? मग करा झटपट कर्ड राईस

Jalgaon Crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; जळगावतील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : संभाजी राजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना

SCROLL FOR NEXT