Vishal Agarwal Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porshe Accident: पोर्शे अपघातातून सुटला, फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला! विशाल अगरवालला पुन्हा अटक; प्रकरण काय?

Pune Porsche Car Accident Latest Update: पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील एका गुन्ह्यातून जामीन मिळताच ब्रम्हा क्रॉप कंपनीचा मालक विशाल अगरवालला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३ जुलै २०२४

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार यांना न्यायालयाने जामी मंजूर केला आहे. मात्र विशाल अग्रवालवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील एका गुन्ह्यातून जामीन मिळताच ब्रम्हा क्रॉप कंपनीचा मालक विशाल अगरवालला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदनिका धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अगरवालला हिंजवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील बावधन परिसरातील ७२ सदनिका धारकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. बावधन परिसरात असलेल्या एका बिल्डिंगमध्ये कव्हर पार्किंग, ओपन स्पेस देतो असे सांगत फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये त्याला अटक करण्यात आली असून ५ जुलैपर्यंत विशाल अगरवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, १९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याचे आई-वडिलांसह आजोबांवरही गुन्हा दाखल झाला होता. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19' च्या घरात तान्या मित्तल ढसाढसा रडली, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : 'सिरप' प्रवर्गातील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये

Urban Land Fragmentation: शहरातील प्लॉटधारकांना सरकारचा मोठा दिलासा, जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द, वाचा काय घेतला निर्णय

ITR Refund: ITR रिफंड प्रोसेस दिसतंय पण पैसे मिळाले नाही? काय करावे? वाचा सविस्तर

Massive fire : हायवेवर मोठी दुर्घटना, २ तासात २०० सिलिंडरचा स्फोट, भयावह घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT