Sassoon Hospital Peon Arrested By Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Crash : पुणे पोर्शे अपघात प्रकरण : माझा मुलगाच कार चालवत होता; आई-वडिलांची पोलीस चौकशीत कबुली

Pune Porsche Car accident case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांची चौकशी केली. या चौकशीत आई-वडिलांनी मोठी कबुली दिली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी पोलीस चौकशीदरम्यान मोठी कबुली दिली आहे. अपघातावेळी माझा मुलगाच गाडी चालवत होता, अशी कबुली अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांनी दिली आहे.

पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान आई-वडिलांनी मोठी कबुली दिली. अल्पवयीन आरोपीच्या आई वडिलांनी अपघातानंतर मिळून कट रचल्याचे मान्य केले. अल्पवयीन आरोपीच्या आईने ब्लड सॅम्पलसाठी रक्त दिल्याची कबुली दिली.

पोलीस चौकशीत अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी मिळून हा कट रचल्याचे मान्य केले. तसचे ससून रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत विशाल अग्रवाल आढळला होता. चौकशीदरम्यान, माझा मुलगाच कार चालवत होता, याची आई-वडिलांनी कबुली दिली.

दरम्यान, विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र, याआधी दोघांना पुण्याच्या जिल्हा औंध रुग्णालायत मेडिकल चेकअपसाठी आणलं. ससून रुग्णालयात आधीचे रक्ताचे नमुने बदलल्याने पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली. त्यामुळे दोघांना ससून रुग्णालयात न घेऊन जाता औंध रुग्णालयात चेकअपसाठी आणण्यात आलं. चेकअप केल्यानंतर दोघांची कोठडीत रवानगी करण्यात आली. ससून रुग्णालयातील रक्ताचे नमुने फेरफार केल्याप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हजर केले जाईल. या प्रकरणात दोघांचा रोल काय होता, हे तपासलं जाईल.

पोलीस चौकशीनंतर शिवानी अग्रवालला फरासखाना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर विशाल अग्रवाल याला लष्कर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. ससून रुग्णालयात फेरफार प्रकरणात दोघेही आरोपी आहेत. या दोघांनाही उद्या पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पवारांसोबतच्या बैठकीनंतर पार्थ पवारांचा सुनेत्रा पवारांना फोन

Herbal Tea : दुधाचा वापर न करता बनवा 'या' ५ प्रकारच्या हर्बल टी

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT