Pune Porsche Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय

Pune Porsche Accident Update: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यत बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यत बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतला आहे. बाल हक्क न्यायालयाने त्याचा जमीन देखील रद्द केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. म्हणजेच आता हा आरोपी 5 जूनपर्यत बाल सुधारगृहातच राहणार आहे. याआधी याच प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जमीन मिळाला होता. भरधाव कारने दोन व्यक्तींना चिरडणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासांत जामीन कसा काय मिळाला, असं म्हणत नागरिकांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सत्र न्यायालयाने पोलिसांना बाल न्याय मंडळात अर्ज करण्याची सूचना केली. यावरच आज सुनावणी झाली.

बाल न्याय मंडळाच्या प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे आणि के. टी. थोरात यांनी बुधवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर निर्णय राखून ठेवला होता. यातच आज अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

न्यायालयात युक्तिवाद करताना पोलिसांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हा गुन्हा गंभीर असून मुलाला प्रौढ घोषित करावे, अशी मागणी केली होती. मात्र यावर अद्याप सुनावणी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यावरही लवकरच निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Split: महाराष्ट्र तुटणार? वेगळा विदर्भ होणार? मंत्री चंद्रशेखर बावणकुळेंनी दिले संकेत|VIDEO

Tuesday Horoscope: दत्त उपासना ठरेल फलदायी, कामातले अडथळे होणार दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Amla Chutney Recipe: तोंडाची चव वाढवणारी आंबट- गोड आवळा चटणी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

टीम इंडियानं वनडे मालिका खिशात घातली; आयसीसीनं अख्ख्या भारतीय संघाच्या खिशात हात घातला

SCROLL FOR NEXT