पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या कारचालक मुलाच्या वडीलांना कोर्टाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालची कोर्टाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. विशाल अग्रवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनासुद्धा पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये आज या प्रकरणावर सुनावणी झाली. विशाल अग्रवाल हे कारचालक अल्पवयीन मुलाचे वडील आहेत. १९ मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगरमध्ये अपघाताची घटना घडली होती यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.
पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला की, 'ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन मुलाला तिथे प्रवेश दिला. विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट कार मुलाला का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजीनगरमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल सापडला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत?
याप्रकरणात वरील सर्व गोष्टींच्या तपासासाठी सरकारी वकीलांनी विशाल अग्रवाल यांची ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. पण कोर्टाने विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर विशाल अग्रवालच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, 'आरोपी फरार नव्हता. 41 A ची नोटीस दिली नव्हती. पुण्यातील ते पब हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले आहेत पोलिसांनी नाही. तिथे जप्त केलेल्या सर्व सामग्री सुरक्षित आहेत. आरोपीला पोलिस कोठडीची आवश्यकता नाही.
त्याचसोबत, सरकारी वकीलांनी युक्तिवाद केला की, ड्रायव्हरने जबाब दिला आहे की आरोपी मुलाने कार चालवायला मागितली होती. या मुलाने त्याला तू शेजारी बस असं सांगितलं. कारचे रजिस्ट्रेशन झालं नव्हतं मग ती रस्त्यावर आलीच कशी? अशाप्रकारचे अनेक प्रश्न वकिलांडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, असीम सरोदे यांनी याप्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल केली. या प्रकरणी २ वेगळ्या एफआयआर का दाखल केल्या? असे म्हणत असीम सरोदे यांनी याचिका दाखल केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.