Pune Porsche Car Accident Case Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: पोर्शेमध्ये तांत्रिक बिघाड ते मुलाकडे गाडी देण्याची सूचना; विशाल अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!

Pune Porche Car Hit And Run Case Update: शहरातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात रोज नवनवे खुलासे होत आहेत.

Gangappa Pujari

पुणे, ता. २३ मे २०२४

गेल्या चार दिवसांपासून राज्यात पुणे शहरातील हिट अँड रन केस चर्चेत आहे. शहरातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात रोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच काल कारमध्ये अल्पवयीन मुलासोबत बसलेल्या चालकाच्या जबाबातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना घडली. याप्रकरणी न्यायालयाने अल्पवयीन मुलाची १४ दिवस बालसुधार गृहात रवानगी केली आहे. अशातच काल अपघातावेळी मुलाच्या शेजारी बसलेल्या चालकाच्या जबाबातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

अपघात झालेली पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. याबाबत मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना माहिती होती तरीही त्यांनी मुलाच्या ताब्यात गाडी दिली, असा खळबळजनक खुलासा चालकाने केला आहे. तसेच मुलाने गाडी चालवायला मागितली, तर त्याला चालवू दे, तु बाजूला बस! असा आदेश विशाल अग्रवाल यांनी दिल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन आरोपीला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणेकर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT