Sangli Loksabha News: सांगलीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी! काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी; ठाकरे गटाचा टोकाचा इशारा

Sangli Loksabha Constituency News: या स्नेहमेळाव्यावरुन काँग्रेस- ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली असून गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस गद्दार असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केला आहे.
Sangli Loksabha News: सांगलीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी! काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी; ठाकरे गटाचा टोकाचा इशारा
Sangli Loksabha Constituency News: Saam Tv

सांगली, ता. २३ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा पार पडला. या स्नेहमेळाव्याला आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र आता या स्नेहमेळाव्यावरुन काँग्रेस- ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली असून गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस गद्दार असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती सांगलीच्या जागेची. ठाकरे गटाने चर्चेविनाच महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसची मोठी कोंडी झाली. काँग्रेस नेत्यांनीही ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शेवटी विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष निवडणुकीला उभे राहिले अन् निवडणूक लढवली.

या निवडणुकीत विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचेच काम केल्याचा आरोप वारंवार केला गेला. अशातच निवडणुकीनंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या स्नेहभोजन मेळाव्यालाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील हजर राहिले. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sangli Loksabha News: सांगलीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी! काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी; ठाकरे गटाचा टोकाचा इशारा
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक अपहाराचे ४० लाख रुपये वसूल; तासगाव शाखेत बँक कर्मचाऱ्यानेच मारला होता डल्ला

ठाकरे गटाचा टोकाचा इशारा

"लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध होता.गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे. याचा पुरावा या स्नेहभोजनातून दिसून येतो," असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिला आहे.

तसेच "काँग्रेसने तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Sangli Loksabha News: सांगलीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी! काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी; ठाकरे गटाचा टोकाचा इशारा
Ahmednagar News: मोठी दुर्घटना! शोध मोहिम सुरू असताना प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटली; ३ जवानांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com