अक्षय बडवे, पुणे साम टीव्ही प्रतिनिधी
Satish Wagh Murder Case : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलेय. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच ५ लाख रूपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती, या घटनेनं पुणे हादरले होते. याप्रकरणात पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून वेगात तपास करत उलगडा केलाय. याच प्रकरणात अक्षय जावळकर, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि अतिश जाधव या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची A to Z कहाणी समोर आली आहे.
सतीश वाघ यांच्या जाचामुळे पत्नीने मारेकऱ्यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मोहिनी वाघ असे सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव आहे. याच प्रकरणात अक्षय जावळकर, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि अतिश जाधव या आरोपींना अटक केली आहे. जावळकर हा काही महिन्यांपूर्वी सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून वास्तव्यास होता. वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले परिणामी त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितले होते.
मोहिनी यांच्याशी असलेली जवळीक सतीश यांना खटकली होती. त्यामुळे दोघांमध्ये सारखे खटके वाढत होते. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच त्याचा काटा काढायचा ठरवले. यासाठी तिने अक्षयला ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यांनतर अक्षयने सराईत गुन्हेगार असलेल्या पवनची मदत घेत सतीश वाघ यांना मारण्याचा प्लॅन आखला. सतीश वाघ यांच्या प्रत्येक हालचालींवर आरोपींचे लक्ष होतं. शिवाय त्यांची सगळी दिनचर्या सुद्धा अक्षय याला माहिती होती. नेहमीप्रमाणे सतीश वाघ ९ डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉक साठी गेले असता त्यांचं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर ७० वार करत त्यांचा खून केला. या घटनेनंतर पुणे हादरले होते. या प्रकरणात पत्नी मोहिनीचे नाव समोर आलेय.
पत्नीनेच सतीश वाघ यांच्या खूनाची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. पत्नीनेच आरोपींना ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. मोहिनीच्या सांगण्यावरून अटक केलेल्या एका आरोपीने इतर आरोपींना सुपारी देऊन वाघ यांचा हत्या केली. अनैतिक संबंधातूनच सतीश वाघ यांचा खून झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. सतीश वाघ यांचे नऊ डिसेंबरला पहाटे अपहरण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे, अक्षय जावळकर आणि अतिश जाधव यांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.