Satish Wagh Case : सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; पत्नीच निघाली मास्टरमाईंड, सुपारी देऊन नवऱ्याला संपवलं

Satish Wagh Case update : सतिश वाघ हत्या प्रकरणाचा सूत्रधार पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. या हत्यामागे पत्नीच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. सुपारी देऊन नवऱ्याला संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Satish Wagh news
Satish Wagh Case Update Saam v
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील सतिश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सतीश वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर सापडला आहे. सतीश वाघ यांची पत्नीच हत्येच्या मुख्य सूत्रधार निघाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उलगडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या मास्टरमाईंड सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.

Satish Wagh news
Cyber Crime Precaution: सायबर गुन्ह्यापासून असा करा बचाव; वाचा टिप्स
Satish Wagh news
Crime News: घृणास्पद! नग्न करून मारहाण, लघवी प्यायला लावली, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

सतीश वाघ यांच्या पत्नीने त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता. या संपूर्ण हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलं आहे. सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मोमा होते.

Satish Wagh news
Amravati Crime News : पीक रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची हत्या; नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

सतीश वाघ यांची हत्या कशी झाली?

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांचं अपहरणानंतर धावत्या कारमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. धावत्या गाडीत हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला होता. धावत्या गाडीत तीक्ष्ण शस्त्राने आणि लाडकी दांडक्याने मारहा ण केली. त्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com