ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अलीकडे सायबर गुन्हेगारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
सायबर गुन्हेगारीच्या काळात सुरक्षेची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आवाजाची नक्कल काढून आर्थिक तसेच खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात बनावट माहिती पसरवत फसवणूक केली जाते.
जर तुम्हाला संशयास्पद फोन आला असेल तर फोन कॉलची खात्री करा फक्त आवाजावर विश्वास ठेवून आर्थिक किंवा महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेऊ नका.
महत्त्वाच्या संभाषणांसाठी व्हिडिओ कॉल किंवा सुरक्षित मेसेजिंग अॅप्सचा वापर करा.
आपले ऑडिओ डेटा सुरक्षित ठेवा सार्वजनिक ठिकाणी व्हॉईस नोट्स किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग शेअर करताना सावध रहा.
जर तुमच्या लक्षात अशा प्रकारचा गैरवापर आला तर जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
आपल्या कुटुंब आणि सहका-यांना आवाज नक्कलीच्या धोक्यांबद्दल माहिती द्या. त्यांना या फसवणूकीबाबत जागृत करा.
NEXT: हॅप्पी ख्रिसमस न म्हणता मेरी ख्रिसमसचं का म्हणतात?