ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगभरात २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. हा दिवस येशूच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.
अनेकवेळा शुभेच्छा देताना हॅप्पी शब्दाचा वापर करतो. परंतु ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना आपण मेरी ख्रिसमस म्हणतो.
हॅप्पी ख्रिसमसच्या ऐवजी मेरी ख्रिसमस म्हणण्यामागे काही कारणे आहेत.
मेरीख्रिसमस म्हणण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे बिशप जॅान यांनी १५३४ मध्ये लंडनचे टॅाप मिनिस्टर थॅामस क्रोमवेलला पत्र पाठवले होते.
बिशपने पत्रात थॅामसला मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. आणि येथूनच मेरी ख्रिसमसचा उच्चार सुरु झाला.
काही रिपोर्टनुसार, मेरी ख्रिसमस हे भावनांशी जुळलेले आहे. या शब्दांमध्ये आनंदाचा भाव अधिक दडलेला आहे.
काही इतिहासकारांच्या मते हॅप्पी शब्द व्यक्तीच्या भावनांबद्दल सांगतो. तर मेरी शब्द व्यक्तीच्या स्वभावाबद्दल सांगतो.
अमेरिकेमध्ये मेरी ख्रिसमसचा वापर केला जातो. तर यूनायटेड किंगडममध्ये हॅप्पी ख्रिसमसचा वापर केला जातो. पण वेळेसोबत दोन्ही वाक्य लोकप्रिय झाले आहेत.
NEXT: मुलांना आजच शिकवा 'या' सवयी, सर्वांकडून होईल कौतुक